मुंबई : आपण व्हॉटस अॅपचा वापर करतो, पण यातील अनेक फीचर्स आपल्याला माहित नसतात, व्हॉटस अॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, जे अतिशय उपयोगाचे आहेत. यातील काही निवडक फीचर्स आणि ट्रिक जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. व्हॉटस अॅप नेहमीच आपण अपडेट करत असतो, पण हे अॅप अपडेट करण्याची कारणं आपण कधीच वाचक नसल्याने अशा प्रकारच्या अडचणी येत असतात, तेव्हा व्हॉटस अॅप अपडेट करत असताना या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की, हे अपडेट कशामुळे आहे, त्यामुळे तुम्हाला व्हॉटस अॅपच्या नवनवीन गोष्टींची माहिती निश्चितच होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईव्ह लोकेशन शेअर करा


अनेक वेळा आपल्या मित्रांना लोकेशन कळत नाही की आपण कुठे उभे आहोत, तेव्हा त्या ठिकाणांचं नेमकं नाव आणि नेमकी जागा आपण कुठे उभे आहोत, हे पाठवण्यासाठी लाईव्ह लोकेशनचे ऑप्शन असते, ते वापरा. यासाठी चॅटमध्ये फॉलो नावाच्या आयकॉनच्या बाजूला दिसणाऱ्या अटॅचमेंटवर क्लिक करा, आणि लोकेशन शेअर करा.


चुकीने पाठवलेला मेसेज डिलीट करा


जर तुम्ही चुकून कुणाला मेसेज पाठवला असेल, तर तो तुम्हाला डिलीट करता येतो, तेव्हा त्या मॅसेजला हळूच टच करून, सिलेक्ट करा, तुम्हाला डिलीट ऑप्शन दिसेल, डिलीट करताना  ‘Delete for me’ आणि ‘Delete for everyone’ असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी  ‘Delete for everyone’ केलं तर तो मेसेज डिलीट होईल.


चॅटला पिन करा


अनेक वेळा आपल्याला वाटतं की, आपले खास जवळचे लोक असतील त्यांचं चॅट नेहमीच वर असलं पाहिजे, जे नेहमी आपल्याशी चॅट करतात. यासाठी व्हॉ़टस अॅपमध्ये पिन टू टॉपचं फीचर आहे. तुम्ही जास्तच जास्त ३ चॅटला पिन करू शकतात.


बनवा GIFS फाईल


WhatsApp वर तुम्हीही GIFS फाईल बनवू शकतात, ज्यात व्हीडीओ GIFS फाईल बनवायची आहे, त्यात व्हीडीओ सेन्ट करा आणि सिलेक्ट करा. आता GIF तयार करण्याचं ऑप्शन येईल. यात अडचण एकच आहे की सहा सेकंदापेक्षा मोठा व्हीडीओ तयार होत नाही.


फोटो एडिट करा


व्हॉटस अॅपवर फोटो पाठवण्याआधी त्याला एडिट करण्याचं ऑप्शन देण्यात आलं आहे. तुम्ही फोटोवर स्माईली आणि इतर अनेक कॅरेक्टर लावू शकता. यासाठी ईमेज वाला फोटो सिलेक्ट करा. आता आपल्याला सर्वात वरती क्रॉप, टी, इमोजी आणि पेनचा आयकॉन दिसेल. यात आपण एडिंटिंगसाठी सिलेक्ट करू शकता.


व्हाट्सअॅप शॉर्टकट


जर तुम्ही एखाद्या मित्राशी चॅट करत असाल, तर आपल्यासाठी शॉर्टकट आहे, शॉर्टकटचा फायदा असा होईल की, मित्राच्या फोटोसोबत फोनच्या स्क्रीनच्या स्क्रीनवरील आयकॉन तयार होईल, तुम्ही व्हॉटस अॅप न उघडता रिप्लाय करू शकता.


चॅटवाल्या मेसेजसोबत रिप्लाय करा


व्हॉटसअॅप एक Quote फीचर आहे. याचा फायदा ग्रुप चॅटमध्ये जास्त घेता येतो. जर तुम्ही ग्रुपमध्ये कुणाच्या मेसेजला उत्तर देऊ इच्छीता, तर मेसेज दाबून सिलेक्ट करा, आणि सर्वात वर रिप्लायवाल्या बटनला क्लिक करून उत्तर द्या.


व्हॉटसअॅप ग्रुपचा मेसेज केव्हा वाचला गेला


पर्सनल चॅट मेसेज कुणी वाचला तर ब्लू टीक येते, आणि मेसेज कधी वाचला ते कळतं, पण ग्रुपमध्ये मेसेज कुणी कुणी वाचला हे समजत नाही. तेव्हा ग्रुपमध्ये मेसेज डिटेल जाणून घेण्यासाठी, जो मेसेज आपण पाठवला आहे, त्याला हळूच टच करा, एक वरती सर्कल येईल, त्यात क्लिक करा, इन्फो ऑप्शनमध्ये पाहा, मेसेज कुणी कुणी वाचला, कुणा कुणापर्यंत पोहोचला.


वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅट करा


तुम्हाला वाटत असेल तर हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषांमधील व्हॉटसअॅप तुम्ही वापरू शकता. यासाठी अॅपला तुम्ही उघडा, आणि स्टेप फॉलो करा Settings > Chats > App Language। यानंतर भाषा निवडा