मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप या चॅटिंग अ‍ॅपशिवाय आजकाल अनेकांचं पानही हलत नाही. जगभरातील लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप मदत करते. मात्र दिवसेंदिवस यामध्ये जसे अपडेट होत आहेत तसेच त्याची सुरक्षितता सांभाळणंही कठीण होत आहे. त्यामुळे काही गोष्टींचं भान राखल्यास व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अधिक सुरक्षितपणे करता येऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेक न्यूजचा धोका टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप'चा पर्याय आणला आहे. या फीचरचे सर्वाधिकार ग्रुप अ‍ॅडमिनकडे असतात. अ‍ॅडमिन मेसेज पाठवू शकतात. रिप्लाय करू शकतात. तर मेंबर्स केवळ मेसेज वाचू शकतात.  


अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना ब्लॉक करता येत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केले तरीही त्याला तुमची माहिती दिसत राहते. हा बग दुरूस्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप प्रयत्न करत आहे. 


चॅटवॉच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीवर नजर ठेवू शकता. त्या व्यक्तीने किती वेळा व्हॉट्सअ‍ॅप उघडले, दोन कॉन्ट्समध्ये किती वेळ बोलणं झालं याचीदेखील माहिती मिळते.  


टेक्स्ट बॉम्ब या बगमुळे अ‍ॅन्ड्राईड आणि आयफोन युजर्सनाही फटका बसू शकतो. यामध्ये काही कॅरेक्टर्स आणि इमोजी फोनला हॅंग करतात.  'दिस इज़ इंट्रस्टिंग' असा मेसेज येतो. त्यानंतर शेवटी एक हसणारा इमोजी दिसतो. 


हॅंग बॉम्ब हा एक फॉर्वडेड मेसेज आहे. यामध्ये एका ब्लॅक पॉईंटवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप हॅंग होते. यामध्ये ब्लॅक डॉट आणि टेक्स्टमध्ये एक स्पेस असतो. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅंग होतो.  


पिज्जा हट स्कॅम हा एक असा मेसेज आहे ज्यामध्ये युजर्सना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर सांगितली जाते. मोफत मिळणार्‍या पिझ्झाच्या हव्यासापायी अनेकजण  त्यावर क्लिक करतात. सोबतच हा मेसेज अन्य काही लोकांसोबत शेअर करण्यास सांगितल्याने तुम्ही नकळत त्यांच्या फोनमध्येही बग येऊ शकतो.