मुंबई : देशभरात असे अनेक युट्यूबर्स आहेत, जे घरबसल्या निव्वळ युट्यूबवर व्हिडिओ टाकून लाखो रूपये कमवतात. हे पाहून तुम्हालाही अशाप्रकारे कमाई करावी असे नक्कीच वाटतं असेल. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीचा उपयोग करून तु्म्ही युट्यूबवरून चांगले पैसे कमवू शकता. त्य़ामुळे नेमकं काय करायचं असतं ते जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हे' व्हिडिओ टाळा
विवादीत व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करणे टाळा. या व्हिडिओमुळे तुमच्या युट्यूबला स्ट्राईकही बसेल. काही घटनांमध्य़े अकाऊंटही बंद होतात. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना ते नियम तर मोडत नाही आहेत ना, याची पडताळणी करून घ्या. विशेष म्हणजे अशा व्हिडिओने तुमची कमाईही रोखली जाण्याची शक्यता आहे.   


इतक्या मिनिटांचा व्हिडिओ बनवा
व्हिडिओ टायमिंग ठरवा आणि तोच कायम ठेवा. जराही व्हिडिओ टायमिंगमध्ये गडबड झाली तर तुमचा युझर्स तूटू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओमधून चांगले पैसे कमवायचे असतील तर व्हिडिओ नेहमी 3 मिनिटांपेक्षा मोठा बनवा. वास्तविक, तुम्हाला यामध्ये अधिक जाहिराती मिळतात आणि तुमची कमाई वाढते.


नियमित व्हिडिओ पोस्ट करा
YouTube च्या सर्वात महत्वाच्या नियमांपैकी एक नियम म्हणजे अपलोड केलेले सर्व व्हिडिओ नियमित ठेवले पाहिजेत. याचे कारण असे की जर व्हिडिओ नियमित नसतील तर युझर तुमचं चॅनेलवर येणार नाहीत. तसेच व्हिडिओ देखील पाहणार नाहीत. 


व्हिडिओत 'या' गोष्टी वापरा 
जर तुम्ही तुमचा व्हिडिओ नुसता शुट करून अपलोड करत असाल तर असे करू नका. कारण यामुळे व्हिडिओशी य़ुझर कनेक्ट होत नाही. अशावेळी ग्राफिक्स आणि अॅनिमेशन वापरा. यामुळे व्हिडिओ प्लेन राहत नाही आणि वापरकर्ते तुमच्याशी कनेक्ट राहतात. इंटरेस्ट वाढवण्याच्या दृष्टीकोनातून या अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत.