मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, अन ते नेटीझन्सच्या पसंतीस उतरेल हे सांगता येत नाही. लग्नात किंवा जिथे कुठे उत्साही मंडळींना थिरकण्याची संधी मिळते, त्याचा ते पुरेपूर फायदा घेतात. यात काही नगही असतात,  जे आपल्या हटके डान्स शैलीने सर्वाचं लक्ष वेधून घेतात. अशाच एका तंबाकू मॅनचा भन्नाट डान्स व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत तो तंबाखू मळतानाच्या  स्टेपवर हटके डान्स करतोय. (young man Tobacco dance funny video viral on social media)   



काय आहे व्हीडिओत?


या व्हीडिओतील तरुण, डान्स करता करता तंबाखू मळतानाची आणि तंबाखू ओठांमध्ये ठेवताना दिसतोय. या अवघ्या काही सेकंदाच्या व्हीडिओने सध्या सोशल मीडियावर आग लावलीये. अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ दिसून येतोय.  या व्हीडिओला आतापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक केलंय.  तसेच या डान्सवर अनेकांनी विनोदी कमेंट्सही केल्या आहेत.   


टीप | तंबाखू आरोग्यास हानीकारक आहे.