मुंबई : तुमच्याकडे एखादी नवी कल्पना असेल तर मुकेश अंबानी यांनी अशा तरुणांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक योजना आखलीय. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केलाय. या प्लॅटफॉर्मद्वारे नव्या कल्पनांसहीत उभारलेल्या स्टार्टअपना जिओ इकोसिस्टमची मदत देते. इथं कंपनीतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासहीत तरुणांना ट्रेनिंगची मदतही मिळते. इथं लोक कधीही आपल्या बिझनेस कल्पना शेअर करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक तीन महिन्याला एक नवा कार्यक्रम सुरू करते. याद्वारे नव्या तरुणांना आणि कल्पनांना हेरलं जातं... त्यांना योग्य दिशा दाखवली जाते. 


तुम्हाला काय करायचंय... 


जर तुमच्याकडेही अशीच एखादी व्यावसायिक कल्पना असेल तर तुम्हाला ती कंपनीकडे पाठवावी लागेल. कंपनी या कल्पना आपल्या ज्युरी सदस्यांसमोर मांडणार... जर तुमची कल्पना स्वीकारली गेली तर कंपनीकडून तुम्हाला तीन महिन्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापासून तो यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टींचं मार्गदर्शन दिलं जाील. 


कंपनीची गुंतवणूक... 


इतकंच नाही तर तुमची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कंपनीच या व्यवसायात गुंतवणूक करणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म काही व्हेंचर कॅपिटल फर्म नसली तरी ही कंपनी अशा काही प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करते जे कंपनीचं लक्ष्य पूर्ण करू शकतील. 


कुठे कराल अर्ज?


कंपनीच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी कंपनीच्या https://www.jiogennext.com/faq या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल. यामध्ये कंपनीद्वारे विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर तुम्हाला एक अर्जही मिळेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर कंपनीकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.