मुंबई : एखादी रेसिपी कशी बनवावी इथपासून थेट एखाद्या अ‍ॅप्सविषयीच्या फंक्शनबाबत काही अडलं असेल तर थेट युट्युबवर त्याचं चटकन उत्तर मिळतं. म्हणूनच दिवसेंदिवस लोकप्रिय होणार्‍या गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म 'युट्युब' चा १२ वर्षांनी मेकओव्हर होणार आहे.  
युट्युबच्या अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएसवरील अ‍ॅप्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. युट्युबचं अपडेटेड व्हर्जन मंगळवारपासून उपलब्ध असेल अशी माहिती चीफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी यूट्यूबच्याऑफिशल ब्लॉगमध्ये दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होणार बदल ? 


# यु ट्युब नव्या लोगो सह मल्टी स्क्रीनचा ऑप्शन देणार आहे. 
# डार्क डेस्कटॉप स्क्रिन या ऑप्शनमुळे व्हिडिओला सिनेमॅटिक लूक येईल. 
# हेडर अधिक ठळक होईल ज्यामुळे कॉन्टेटवर लक्ष वेधले जाईल. 
# नेव्हिगेशन टॅब्स अगदी तळाशी जातील म्हणजे अ‍ॅक्सेस सोपा होईल. 
# लायब्ररी आणि अकाऊंटमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जातील. 
# डबल टॅप करून व्हिडिओ १० सेकंद पुढे मागे करण्याची नवी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे व्हिडिओचा स्पीडदेखील कमी जास्त होऊ शकतो. 
# युट्युब प्लेअरच्या आकारातही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे तो उभा, आडवा आणि चौकोनी आकारात उपलब्ध असेल.