मुंबई : व्हिडीओ पाहण्यासाठी YouTube सगळ्यात जास्त पाहिलं जातं. भारतात अजूनतरी युट्यूब फ्री सेवा देत आहे. पण अॅड फ्री पाहण्यासाठी युट्यूब प्रिमियम भरावं लागत आहे. भारतात युट्यूब खूप जास्त प्रसिद्द आहे. आता या अॅपच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. हॅकर्सनी नवीन आयडिया शोधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅप आणि गुगल प्ले स्टोअरवर मालवेअर फसवणुकीच्या अनेक प्रकरणांनंतर यूट्यूबवरुन हॅक करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. ते पासवर्ड, टेलीग्राम मेसेज आणि अगदी स्क्रीनशॉट्स चोरतात. तुम्ही YouTube वर स्क्रोल करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. असे काही व्हिडीओ आहेत जे तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात. 


80 व्हिडीओ तुमचा फोन चुकटीत करतील हॅक
व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या फोनमधील डेटा चोरी करण्याचा डाव आहे. पेनीवाइज नावाचा मालवेअर फोनमध्ये सोडला जात आहे. ह्या 80 व्हिडीओपैकी तुम्ही कोणता पाहात असाल तर तुमच्या फोनमधील डेटा चोरी होण्याची शक्यता आहे. मालवेअर पीडित व्यक्तीच्या डिव्हाइसमधून संवेदनशील ब्राउझर डेटा आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट चोरण्यावर लक्ष केंद्रित करतो.


सायबर सिक्योरिटी रिसर्चर्स YouTube वर अनेक व्हिडिओ सापडले आहेत जे तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. यापैकी बहुतेक व्हिडीओ बिटकॉइन मायनिंग सॉफ्टवेअर कसे कार्य करतात हे स्पष्ट करतात. व्हिडीओच्या डिस्क्रिपशनमध्ये डाउनलोड लिंक मिळते. ह्या लिंकवर तुम्ही क्लीक केलं की तुमच्या फोनमधील पासवर्ड, मेसेज, फोटो, आणि सगळा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्हायरस सोडला जातो. 


ह्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला VirusTotal ची लिंक मिळते. यावर क्लीक केलं की तो क्लीनचा पर्याय निवडायला देतो. तिथे क्लीक करुन पुढे गेल्यावर सुरक्षित असल्याचं सांगतो. 


 पेनीवाइज मालवेअर हा क्रोम, क्रोमवर आधारीत ब्राउझर, मोझिला, मायक्रोसॉफ्ट एज यावरही हल्ला करू शकतो. एवढंच नाही तर तुमच्या कुकीजमधील डेटाही त्याच्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकतो.  एन्क्रिप्शन Key, मास्टर पासवर्ड, डिस्कॉर्ड टोकन मालवेअर तुमच्या फोनमधून काढून घेतो. 


या गोष्टी टाळण्यासाठी काय कराल?
- कोणत्याही अनऑथोराइज साईटला, लिंकवर भेट देऊ नका
- आपला OTP कोणालाही शेअर करू नका
- आपल्या फोनमधील आवश्यक गोष्टींचे पासवर्ड वेळोवेळी बदला
- फोनमध्ये थर्डपार्टी अॅप डाऊनलोड करू नका, अत्यावश्यक असल्यास सगळ्या परवानगी त्याला देऊ नका