लंडन :  युट्युबवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांसाठी अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध असणारे असे व्हिडिओ घातक असल्याचा धोका ओळखून युट्युबने असे व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  


दहा हजार  लोकांची भर्ती होणार 


युट्युबवरील आक्षेपार्ह  व्हिडिओ हटवण्यासाठी  10,000 लोकांची भर्तीहोणार आहे. ही माहिती युट्युबच्या अधिकार्‍यांनी द डेली टेलिग्राफ़ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार युट्युबवरचा वापर काहीजण चूकीच्या गोष्टींसाठी करत आहेत. ते हटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.  


व्हिडिओ हटवले 


युट्युबने सुमारे ५० चॅनल्स हटवले आहेत. तसेच 5 लाख आक्षेपार्ह व्हिडिओंवरील अ‍ॅडस आणि हजारो व्हिडिओ हटवल्याची माहिती युट्युबने दिली आहे.  


युट्युबवर टीका 


युट्युबवर अनेक माध्यमातून टीका होत आहेत. अनेक अ‍ॅडव्हर्टायझर्स आणि रेग्युलेटर्सच्या माध्यमातूनही टीका होत आहे. युट्युबच्या सेवेतून  लोकांची मतं तयार होतात. त्यामुळे व्हिडिओंची निवड कटाक्षाने व्हावी असे त्यांचे मत आहे.