मुंबई : तुम्हाला जर घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर Zomatoने तुमच्यासाठी पैसे कमावण्याचा उत्तम पर्याय समोर ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला फक्त झोमॅटो या ऑनलाईन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्मला एक छोटीशी मदत करावी लागेल. ज्यानंतर कंपनी त्यांचा प्रॉफिट पाहून तुम्हाला पैसे देईल. तसा तर हा हॅकिंगशी संबंधीत असण्याऱ्या लोकांसाठी योग्यमार्गाने पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Zomato ने गुरुवारी त्याच्या अ‍ॅपमधील किंवा अ‍ॅपमधील बग शोधून काढणाऱ्याला बक्षिसे देण्याची घोषणा केली आहे. झोमाटोच्या म्हणण्यानुसार, एखाद्याला व्यक्तीने वेबसाइटमधील किंवा मोबाईलच्या अॅपमधील एखादा बग शोधून काढला तर, त्याला 4 हजार डॉलर्स म्हणजेच (2.99 लाख रुपये) बक्षीस दिले जाईल.


फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कडून सांगण्यात आले की, "झोमाटो बग बाउंटी कार्यक्रम हा आमच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आम्हाला आशा आहे की, ही सुधारणा हॅकर कम्यूनिटीला आणखी प्रेरणा देईल. आतापर्यंत आमच्या कार्यक्रमात आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद आणि आम्ही आपल्या अहवालाची अपेक्षा करत आहोत."


अशा प्रकारे बक्षीस दिले जाईल
Zomato कडून ट्वीट करून ही माहिती दिली आहे. CVV (Common Vulnerability Scoring System) हा या गोष्टीचा आढावा घेईल की, शोधलेल्या बगमुळे कंपनीचे किती नुकसान झाले असते. त्या आधारावर लोकांना बक्षीस दिले जाईल. “उदाहरणार्थ, CVSS 10.0 असल्यास 4 हजार डॉलर्स दिले जातील, तर CVSS 9.5असल्यास 4 हजार डॉलर्स दिले जाईल.”


Zomato Bug बाउंटी प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. या फूड ऑर्डर प्लॅटफॉर्मने मोठ्या बगसाठी अधिक पैसे देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. याव्यतिरिक्त, Zomatoला कमी जोखीम असलेले बग शोधणार्‍यास कमी पैसे दिले जातील असे देखील सांगितले आहे.