मुंबई : भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या, मारुती अल्टो कारने गेल्या १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला असल्याचं जाहीर केलं आहे. ऑल्टोच्या अतुलनीय कामगिरीमुळे ही सलग १५ वर्षात चागंली विक्री होणारी कार ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकीने अल्टोच्या डिझाइन आणि टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही बदल केले आहेत. सोबतच कंपनीने कारच्या किंमतीही परवडणाऱ्या दरात ठेवल्या. नवीन अल्टो भारतातील पहिली बीएस६ एन्ट्री सेगमेन्ट कार आहे. याची इंधन क्षमता २२.०५ किलोमीटर प्रति लीटर इतकी आहे.


नवीन डिझाइन आणि सेफ्टी फिचर्ससह अल्टो वापरकर्त्यांना चांगला अनुभव देत असल्याचं ग्राहक सांगतात. ड्रायव्हर एयरबॅग, स्टॅंडर्ड इक्विपमेन्ट बनवण्यात आल्यानंतर अल्टो आपल्या श्रेणीमध्ये एकमेव अशी कार आहे जी, आपल्या बेस वेरिएन्टपासूनच एयरबॅगचा पर्याय देते.


नव्या अल्टोमध्ये अॅन्टीलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर-को-ड्रायव्हर दोघांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर असे सेफ्टी फिचर्स सामिल आहेत.



  


उच्च इंधन कार्यक्षमतेसह, ऑल्टो गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. सध्या, अल्टो बाहेरच्या नवीन सुधारित डिझाइनसह, नवीन इंटिरियरसह बाजारात आली आहे. ही कार ग्राहकांसाठी सीएनजीमध्येदेखील उपलब्ध करण्यात आली आहे.