नवी दिल्ली: सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरलेली सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ या महिलेच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘ब्रॉडकास्टींग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिल’कडे (BCCC) ने या मालिकेच्या प्रसारण वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लहान मुले ही मालिका बघू शकणार नाहीत. त्याचबरोबर बीसीसीसीने ‘ही मालिका बालविवाहास प्रोत्साहन देत नाही' हे सूचनेची पट्टी देखील मालिकेदरमान्य दाखवण्याचे सूचित केले आहे. 


बीसीसीसीचे प्रमुख न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मालिकेत ९ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यांचं लग्न होताना दाखवण्यात आलंय. त्यामुळे मालिकेवर बंदी आणण्याची मागणी झाली. या मालिकेचे प्रसारण गेल्या महिन्यापासूनच सुरु झाले आहे. 


याचाच विचार करत बीसीसीसीनं मालिकेच्या वेळेत बदल करण्याची सूचना दिली आहे. संध्याकाळी साडेआठ वाजता लागणारी ही मालिका रात्री १० वाजता प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालिकेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही कथा काल्पनिक असून ती कोणत्याही प्रकारे बालविवाहास प्रोत्साहन देत नाही.