ठाणे : अंबरनाथ शहरातल्या डम्पिंग ग्राऊंडला गेल्या २ ते ३ दिवसांपासून मोठी आग लागली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून या आगीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंबरनाथ शहरातल्या मोरीवली पाड्यातील हे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडला गुरुवारी लाग लागली आहे. गुरुवारपासून लागलेली आग अजूनही धुमसत आहे. या आगीचा मोठा धूर झाला असून धूरामुळे परिसरातील नागरिकांना अशा घातक धूरात राहवे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचे तापमान पाहता तेथे आग लागत आहे. कचऱ्यावर माती टाकून आग बुझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकर मागवण्यात आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले आहे. 


गेल्या ३ दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग सतत धुमसत आहे. धुरामुळे अंबरनाथमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारपासून २ ते ३ दिवस होऊनही आगीकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. परिसरातील नागरिकांकडून आग लवकरात लवकर विझवण्यात येण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वीही अंबरनाथच्या या डम्पिंग ग्राउंडला अनेकदा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सतत आगी लागण्याच्या घटना घडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.