Kopri Bridge Inaugration: तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला आता पुलांचे शहर अशी नव्याने ओळख मिळण्याची शक्यता आहे. कारण झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या ठाण्यात रस्ते कमी पडत आहे. परिणामी राज्य सरकार आणि महानगरपालिका यांनी ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवर नवीन पूल उभारून (bridges construction) ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचपार्श्वभूमीवर आज (9 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते MMRDA अंतर्गत तयार झालेल्या कोपरी पुलाचे उद्धाटन होणार आहे. 


नवीन दोन मार्गिका तयार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि ठाणे (Mumbai - Thane) शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण  झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु होते. जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन दोन मार्गिका उभारण्यात आल्या. 


वाहतुक कोंडी सुटणार 


मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा कोपरी उड्डाणपूल (Kopri Bridge Inaugration) हा वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग धोकादायक तसेच अरुंद असल्याने 2018 पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मध्य रेल्वेकडून हा उड्डाणपूल तोडून त्याठिकाणी आठ पदरी पूल करण्याचे काम सुरू केले आहे. एमएमआरडीएने दोन टप्प्यात या पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी या पूलाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच, मुख्य पूलालगत दोन अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या अतिरिक्त मार्गिका सुरू झाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेने मुख्य उड्डापणूलाच्या मार्गिकेच्या निर्माणाचे म्हणजेच, मुख्य पूलाचे काम हाती घेतले होते. मात्र आज ठाणे-मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पूलाची कामे पूर्ण झाल्यामुळे हा पुल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे.