ठाणे : स्मार्टफोन हातात असणाऱ्यांच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्मार्ट असणाऱ्या दुनियेत एका नव्या ऍपची चर्चा सध्या सुरु आहे. ठाण्यातील तीन तरुणांनी एकत्र येत हे अॅप तयार केलं आहे. या ऍपचं नाव आहे, 'येताव'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय कल्पकतेने तयार करण्यात आलेल्या या ऍपमध्ये एखाद्या प्रवाशाने रिक्षा किंवा खासगी वाहनाने कुठेही जात असताना आपलं निघण्याचं ठिकाण आणि पोहोचण्याचं  ठिकाण या ऍपवरुन शेअर करावं.


इतर कोणालाही त्याच वाटेवर जायचं असल्यास, तेही या प्रवासात सहभागी होऊ शकतील. मुख्य म्हणजे या ऍपमध्ये महिलांसाठीही विशेष कॉलम ठेवण्यात आला आहे. सहप्रवासी महिलाच असाव्यात या दृष्टीकोनातून हा विशेष कॉलम तयार करण्यात आला आहे. या अॅपच्या माध्यमातून तुमचं लोकेशनही तुमच्या कुटुंबीयांना कळणं शक्य आहे. शिवाय काही अडचण आल्यास महिला कुटुंबीयांना या ऍपच्या माध्यमातून मेसेजही पाठवता येणार आहे. रिक्षा प्रवाशांसाठी ही सुविधा मोफक आहे. तर, खासही वाहनांसाठी यात नाममात्र शुल्क घेतलं जातं. संपूर्ण देशभरातील प्रवासी या ऍपचा वापर करु शकतात.



वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी


आनंद वामनसे, यांनी या ऍपच्या नावाचा उलगडा केला. कोकणातील अनेक ठिकाणी बोलीभाषेमध्ये या शब्दाचा वार केला जातो. तोच संदर्भ घेत या ऍपचंही नाव येताव असं ठेवण्यात आलं. वामनसे यांच्यासोबतच सुबोध मिस्त्री, रुपेश चौधरी यांनी हे ऍप तयार केलं आहे.