सरकारमधील काही जणांनी अर्थसंकल्पातील गुप्त माहिती बाहेर फोडली; काँग्रेसचा आरोप
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत.
नवी दिल्ली : अर्थसंकल्प मांडण्याआधीच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे हे प्रसारमाध्यमांना पाठवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसच्या मनिष तिवारी यांनी हा आरोप केला आहे. मोदी सरकारमधील काही लोकांनीच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुप्त माहिती प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा आरोप काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केला आहे. आज सकाळपासून सरकारी सूत्रांकडून प्रसारमाध्यमांना अर्थसंकल्पातील मुद्दे पाठवले जात आहे. हेच मुद्दे हंगामी अर्थमंत्र्यांच्या भाषणात असतील तर ही खूप गंभीर गोष्ट असेल. यामुळे गुप्ततेच्या नियमांचा भंग होईल, असे मनिष तिवारी यांनी सांगितले.
संसदेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुका समोर ठेऊन जनेतला खुश करण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा असेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत.