big breaking : नागपूर संघ मुख्यालयात रेकी
संघ मुख्यालय दहशत वाद्यांच्या रडारवर
नागपूर : नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून हि रेकी करण्यात आल्याचे समजतंय. या घटनेमुळे नागपुरात खळबळ माजली आहे. दरम्यान, संघ मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जैश ए मोहम्मद अतिरेकी संघटनेकडून रेकी झाली होती अशी माहिती दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी रेकी करण्यात आली आहे तेथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे असेही ते म्हणाले.