चंद्रपूर:  कोरपना तालुक्यातील अंमलनाला धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात हिरवे झाल्याचे दिसून येत आहे. शेवाळामुळे पाण्याला हिरवा रंग आला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 


धरणातील पाणी अचानक गडद हिरवे झाल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. यानंतर तहसीलदारांनी पाण्याचे नमुने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. अंमलनाला धरण माणिकगड टेकड्यांच्या पायथ्याशी असून नैसर्गिकरित्या उंच टेकड्यांमधून वाहून येणारे पाणी याठिकाणी अडवण्यात आले आहे. टेकड्यांच्या वरच्या भागात सिमेंट कंपन्यांनी चुनखडीच्या खाणी खोदल्या असून या खाणी पाण्याने भरल्याने त्याचा विसर्ग आता धरणात येऊ लागला आहे. त्यामुळे हिरवे पाणी नैसर्गिक आहे की दुषित याची पडताळणी केली जात आहे.