नागपूर : भंडाऱ्यात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु झालीये, अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालं. चातकासारखी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागेल, सकाळपासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी  सुखावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपुरात 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं शहरातील वाहतूकीवर परिणाम झाला. तर अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत अवघा 5 टक्केच पाऊस झाल्यानं, बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 


गोंदिया जिल्ह्यात अखेर 8 दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावली. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी देखील पावसाची चातका प्रमाणे वाट पाहत होता. अखेर दुपारी जोरदार पाऊस झाला. आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.