नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. पहिल्या लाटेमध्ये ज्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात होती, त्या जिल्ह्याही आता कोरोनाचे रुग्ण वाढतच चालेल आहे. वर्धा,भंडार, चंद्रपूर या जिल्ह्यात वेगाने रुग्नांची वाढ होत आहे. विदर्भात मागील 24तासांत 6 हजार 970 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसें दिवस ही दुसरी लाट जास्त भयानक होत आहे.


विदर्भातील जिल्हयांतील एकूण रुग्ण आणि मृत्यूचे आकडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा : रुग्ण : मृत्यू


नागपूर : 3 हजार 717 : 40


गोंदिया : 50 :00


भंडारा :219: 01


चंद्रपूर :276 : 00


वर्धा : 308 : 04


गडचिरोली : 39 : 01


अमरावती : 381 : 06


यवतमाळ : 440 : 08


वाशिम: 278 : 02


बुलडाणा : 855 : 00


अकोला: 407 : 04


जर तुम्ही ही आकडेवारी पाहाल तर नागपूरात जास्त रुग्ण संख्या आहे आणि तेथील परिस्थीती जास्त भयानक आहे.


नागपूर शहरातील कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता हॉस्पिटलमध्येही बेडची मागणी वाढत आहे. नागरिकांना वेळेवर रुग्णालयात भरती करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, परंतु हे संपूर्ण प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.


बेडच्या शोधात रुग्ण भटकत आहेत


नागपुरातील परिस्थिती अशी आहे की,आता रुग्णांना स्वत: हून बेडच्या शोधात  भटकंती करावी लागत आहे. एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर खाली झालेला बेड ज्या रुग्णाला भेटत आहेत ते स्वत: ला भाग्यवान मानत आहेत.