बाप्पाला निरोप देण्यासाठी पोर्टेबल विसर्जन टँक
फोन केला की घराच्या दारात हे मोबाईल विसर्जन केंद्र हजर होते.
नागपूर: आता नागपूरकरांना घरबसल्या आपल्या बाप्पाला निरोप देता येणार आहे. नागपूरच्या धरमपेठ झोनमध्ये थेट नागरिकांच्या घरापर्यंत मोबाईल कृत्रिम विसर्जन टँक पोहोचविण्याची अनोखी संकल्पना राबविण्यात येत आहे.
लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांना कुठलंही विघ्न वा त्रासाविना तसंच पर्यावरणपुरक विसर्जन करता यावे यासाठी नागपुरात मोबाइल विसर्जन टँक तयार करण्यात आले आहेत. फोन केला की घराच्या दारात हे मोबाईल विसर्जन केंद्र हजर होते. धरमपेठ झोनमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मोबाईलवरच विचारणा आणि बुकींग केल्यानंतर ठरलेल्या वेळेवर हे मोबाइल विसर्जन केंद्र भाविकांच्या घरी पोहोचते.
घरगुती बाप्पांसोबतच कॉलनीतील बाप्पांच्या विसर्जनासाठीही ही सेवा उपलब्ध आहे. तसेच जर बुकींग नसेल तर रस्त्याच्या चौकातही ही मोबाइल विसर्जन टँक उभारण्यात येतील.