चंद्रपूर जिल्ह्यातील मुक्ताई धबधब्यावर पर्यटकांची तोबा गर्दी
वाघाईच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक पावसाळी पर्यटनस्थळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. चिमूर तालुक्यात असणाऱ्या मुक्ताई हे पर्यटन स्थळ सध्या असच पर्यटकांनी ओसंडून वाहतंय. चिमूर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेलं मुक्ताई हे वाघाई च्या डोंगरावर असून हे माना समाजाचं जागृत देवस्थान आहे. अतिशय घनदाट जंगलात असलेला हा परिसर सध्या पर्यटकांनी गजबजून गेलाय. वाघाईच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र आहे. ५५ फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि जंगलाचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी इथे चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताहेत. यंदा आतापर्यन्त ३३ टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. यामुळेच मुक्ताई धबधबा जिवंत झाला आहे. सध्या विकेंडला चंद्रपूर , वर्धा आणि लगतच्या नागपूर जि ल्ह्यातील युवा पर्यटक या पर्यटनस्थळी तोबा गर्दी करत आहेत.