Video| भारताच्या शिरपेचात `विक्रांत`तुरा
Sun, 28 Aug 2022-11:10 am,
2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy
२ सप्टेंबर हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे. एकीकडे हिंदी महासागरात चीनच्या कुरापती वाढत असताना भारताच्या ताफ्यात दुसरी विमानवाहू युद्धनौका येत आहे. याआधी भारताकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस विराट या युद्धनौका होत्या. आता भारताच्या ताफ्यात भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत येत आहे. सध्या भारताकडे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. 15 मजली इमारतीएवढी तिची उंची आहे. आयएनएस विक्रांतवर मिग 29 के ही लढाऊ विमानं आणि कामोव्ह 31 ही हेलिकॉप्टर तैनात असणार आहेत.