Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!

Thu, 25 Aug 2022-7:50 am,

75 thousand government jobs will be available in a year नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link