औरंगाबाद । शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही - जिल्हाप्रमुख
Tue, 05 Mar 2019-4:55 pm,
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा परिषदेतली काँग्रेसोबतच्या आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.