गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही? आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असं धक्कादायक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केलं.