मुंबई । सीडकोची घरे होणार स्वत:च्या मालकीची
Fri, 21 Dec 2018-12:05 am,
सिडकोची मिळणारी घरे 99 वर्षे कराराच्या लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोत राहणाऱ्या नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार असल्याने नाशिकमधील घर धारकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.