नागपूर । दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या
Wed, 31 Oct 2018-9:20 pm,
धक्कादायक बातमी नागपूरमधून. दिवाळीची खरेदी करू न दिल्याने एका २० वर्षांच्या कॉलेज तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केली. दिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. पायल करडभाजने असं मृत तरुणीचं नाव आहे. पायल वसंत नगरमध्ये राहात होती. पायल महाविद्यालयात शिकत होती. तिला एक लहान बहीण आणि लहान भाऊ आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमाराला पायलनं घरी गळफास लावून आत्महत्या केली.