Video| धाराशीवमधील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, 510 कोटींचा खरिपाचा पीकविमा मिळणार
Mon, 05 Sep 2022-1:45 pm,
dharashiv farmers will get 510 crore crop Insurance
धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे...धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील साडे तीन लाख शेतक-यांना खरीपातील 510 कोटींचा पीक विमा मिळणार आहे.. विमा कंपनीनं याबाबत दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीये.. या आधीही हायकोर्टानं शेत-यांच्या बाजूनं निकाल दिला होता.. मात्र त्याविरोधात कंपनीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली.. सुप्रीम कोर्टानं तो निकाल कायम ठेवत विमा कंपनीची याचिका फेटाळली त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ५१० कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.