अहमदाबाद । हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार
Sat, 30 Mar 2019-12:15 am,
काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. २०१५ मधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी झालेल्या शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.