बंगळुरु । कर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात?
Thu, 11 Jul 2019-11:15 am,
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.