Video| डॉक्टरांसमोरच हृदय बंद पडलं! क्षणात डॉक्टरांनी बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरु केलं; पाहा व्हिडीओ

Mon, 05 Sep 2022-1:10 pm,

kolhapur doctor saved patient life देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय एका पेशंटला आलाय. नियमित तपासणीसाठी डॉक्टरांसमोर बसलेल्या आणि डॉक्टरांशी बोलत असताना पेशंटचं हृदय अचानक बंद पडलं. यावेळी डॉक्टरांनी या पेशंटवर तत्काळ उपचार करत त्याला जीवदान दिलं. कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. डॉ. अर्जुन आडनाईक यांनी या पेशंटला जीवदान दिलंय. डॉ. आडनाईक यांच्यासमोर एक पेशंट बसला होता. त्यांच्याशी बोलत असताना अचानक त्या पेशंटचं हृदय बंद पडलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link