मुंबई । शहरात दिवसा लहानग्या शालेय मुलीची छेड
Tue, 16 Oct 2018-5:45 pm,
अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तुमच्या आमच्या घरातल्या लहानग्यांशी संदर्भात ही बातमी. मुंबई सेंट्रल पुलावर घडलेली एक घटना. त्यात नराधमानं केलेलं कृत्य प्रचंड चीड आणणारं होतं. मुंबई सेंट्रल स्थानकावरचा पूल. शाळेतल्या दोन लहानग्या मुली त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहात उभ्या होत्या. पुढे जे घडलं ते अत्यंत संतापजनक होतं. एक व्यक्ती येते. हातातील सामान खाली ठेवतो आणि मुलींना हात लावतो. सामान घेऊन परत जातो.