बुलडाणा । बदला घेतल्याचा अभिमान वाटतो, शहीद नितीन यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2019/02/26/00000005_5.jpg?itok=Qje4Zy4u)
भारताने आज माझ्या मुलाचाच नव्हे तर शहीद झालेल्या सर्वच सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेततला आहे. याचा अभिमान आणि आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी दिली आहे. पाकिस्तान सतत कुरापती करत असल्याने त्यांचा असाच बदला घेत रहावे, असंही त्यांनी म्हटले आहे. तर सतत हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नीतीन राठोड यांच्या भावाने केली आहे.