मुंबई । लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे श्रेष्ठींना पत्र
Tue, 09 Jul 2019-10:10 am,
मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला संजय निरुपम गटाने काहीही मदत केली नाही, असे पत्र काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहून माहिती दिली आहे. हे पत्र मे महिन्यानंतर आज उघड झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम यांनी जाहीर टीका केली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.