मुंबई । ठाणे आणि मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना - आव्हाड
Thu, 06 Feb 2020-9:55 pm,
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल. तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशच्या (मुंबई वगळून) विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.