मुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त
Thu, 18 Apr 2019-11:50 pm,
सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.