मुंबई । नालासोपाला येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको
Sat, 16 Feb 2019-11:50 pm,
१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभारात संतापाचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याला जशाच तसे उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेल्वे रुळावर उतरून रेलरोको केला.