नंदूरबार । धरणात चार मुले बुडालीत
Wed, 05 Jun 2019-11:05 pm,
ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.