नाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
Tue, 19 Feb 2019-5:25 pm,
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे