औरंगाबाद । रोहित पवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस, राम शिंदेंची तक्रार
Tue, 11 Feb 2020-10:55 pm,
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.