Video| टोमॅटो 500 रुपये किलो, कांदे 400 रुपये किलो... भाज्या महागल्या
Mon, 29 Aug 2022-12:05 pm,
Prices of vegetables in Pakistan increased
पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांना हैराण केलंय. पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलोने विकला जातोय. लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय. त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत कित्येक पटींनी भर घातलीय. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणा-या भाज्यांची आवक घटलीय. त्यामुळे वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा पाकिस्तानचा विचार आहे.