पुणे । विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, केरळ ढोल-पथकाचे खास आकर्षण
Thu, 12 Sep 2019-11:20 am,
पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पहिला मानाचा समजला जाणारा कसबा गणपती मुख्य मंडपातून मार्गस्थ झाला आहे.