पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली. 11 मुलींना उपचारासाठी राजुरीच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले. तर एका मुलीवरती आळेफाट्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.