न्यूयॉर्क । सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्या

Sat, 29 Sep 2018-8:15 pm,

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची परिषद सुरू आहे. त्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये आहेत. या परिषदेदरम्यान सार्क देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची एक अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वराज हजर होत्या. तिथं आपली बाजू मांडल्यानंतर त्या उठल्या आणि थेट बाहेर पडल्या.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link