Video| तुमच्या घरी येणारं तूप भेसळयुक्त?
Wed, 24 Aug 2022-10:40 am,
The ghee that comes into your home is adulterated
गौरी गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल तर सावधान... कारण मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी टोळी पकडलीय. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलीय. घाऊक व्यापा-यांकडून एकूण 7 लाख 38 हजारांचं तूप जप्त करण्यात आलंय. बेकरीची नियमित तपासणी करताना त्याठिकाणी वापरण्यात येणा-या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. त्याची पुण्यातल्या राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं.