Video | पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार! शिंदे सरकारकडून हालचालींना सुरुवात

Sun, 04 Sep 2022-12:20 pm,

The issue of police houses will be resolved पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.. राज्यात सध्या पोलिसांची संख्या 2 लाख 43 हजार असून साधारणत: ७० टक्के पोलिसांना घरे देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी ८२ हजार घरांची आवश्यकता आहे. म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास योजनांमध्ये पोलिसांसाठी तब्बल २५ टक्के घरे आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा लवकरच अंतिम केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळ आणि शहर परिवहन उपक्रमांच्या आगार आणि बस स्थानकांचा विकास करून त्यातूनही पोलिसांसाठी काही प्रमाणात घरे निर्माण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link