Video| मुंबईत आजपासून भुयारी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात...

Tue, 30 Aug 2022-8:50 am,

The trial of Metro 3 will start from today कुलाबा- बांद्रा- सिप्झ या मुंबई मेट्रो 3 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आज चाचणी होणार आहे. आरे वसाहतीतल्या सारिपूत नगर ते मरोळ नाका या 3 किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखालच्या बोगद्यातून ही चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील. पुढील सहा महिन्यात जवळपास 10 हजार किमीपर्यंत मेट्रो 3 वरच्या गाड्यांच्या चाचण्या होणार आहेत. मेट्रो गाड्यांचा वेग, ब्रेकींग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेकींग सिस्टीम अशा विविध तांत्रिक चाचण्या होणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link