Video | पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस! पाहा पावसाच्या सुपरफास्ट बातम्या
Tue, 18 Oct 2022-8:15 am,
Top Speed News Bulletin
सोमवारी रात्री 9.30 वाजण्यानंतर पुण्यात पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली (Pune Heavy Rains). पुण्यातला पाऊस इतका धडकी भरवणारा होता, की अनेकांनाच 2019 च्या पुराची आठवण झाली. दक्षिण आणि मध्य पुण्यामध्ये पावसानं लावलेली हजेरी अनेकांनाच महागात पडली. पुण्यातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. पाण्याची पातळी बघता बघता इतकी वाढली, की पुण्याच्या रस्त्यांवर लाटा उसळू लागल्या. जणू काही समुद्रालाच उधाण आलं. या लाटा होत्या पावसामुळं तुंबलेल्या पाण्याच्या