Video | मोगली लँडवर आला बगीरा; चपळ काळ्या बिबट्याची पाहा एक झलक
Wed, 24 Aug 2022-8:30 am,
Watch the video of Bagheera coming to Mowgli Land in Panch Sanctuary
पेंच व्याघ्र प्रकल्पात मोगली लँड म्हणून ओळख असलेल्या भागात सध्या बगिरा पर्यटकांना दर्शन देतोय.. झी 24 तासच्या प्रेक्षक आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तानिय तिवारी-ठक्कर यांनी कॅमेरात या काळ्या बिबटला चित्रित केलेय. जंगलात एका झाडाच्या फांदीवर अगदी ऐटीत हा काळा बिबट उभा आहे. त्यानंतर तो झाडावरून उतरत आहे याचा व्हिडिओ आपण झी 24 वर एक्सकलुसिव्ह पाहू शकतो... बगिराचे दर्शन पेंचच्या जंगलात झाल्यापासून या भागात पर्यटकांची रीघ लागली आहे. रुद्रयार्ड किपलिंग यांच्या द जंगल बुक मध्ये मोगली ,शेरखान इतकेच बगिरा हे पात्रही प्रचंड गाजले होते. त्याचे स्मरण करून देणारा हा काळा बिबट महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील खवासा बफर क्षेत्रात वावरतोय. .जेनेटिक कारणांमुळे या बिबट्याचा रंग असा झाला असल्याचे तज्ञ सांगतात.