पुणे: मेट्रो प्रकल्पाच्या खोदकामामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. खोदकाम सुरु असताना बीएसएनएलच्या अनेक भूमिगत केबल तुटल्या. परिणामी पौड रोड भागातील सुमारे तीन हजार दूरध्वनींची तसेच इंटरनेटची सेवा खंडीत झाली आहे. यामध्ये बीएसएनलचे अंदाजे ३ ते ४ कोटींचे नुकसान झालेय. ही सेवा पूर्ववत व्हायला आणखी ८ ते १० दिवस लागतील.